स्थानिक स्वराज्य मतदार संघात काँग्रेसकडून मोर्चेबांधणी; अनिल पटेलांनी घेतली जालना जि.प. सदस्य, नगरसेवकांची बैठक

Foto

औरंगाबाद: औरंगाबाद-जालना स्थानिक मतदार संघाची निवडणुक पुढील महिन्यात होणार आहे. या मतदार संघातून सध्या काँग्रेस आघाडीचे सुभाष झांबड हे आमदार आहेत. हा मतदार संघ आपल्याकडेच राहावा यासाठी काँग्रेस पक्षाकडून मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. रविवारी जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरसेवकांची बैठक घेतली आहे. अशी माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी सांजवार्ताशी बोलतांना दिली. 
स्थानिक मतदार संघातील ही निवडणुक पक्षीय पातळीवर घेतली जाते.

 जिल्हा परिषद आणि नगर परिषद महानगरपालिकेचे नगरसेवक हे मतदार आहेत. ही निवडणुक पसंती मतावर अवंलबून असल्याने पक्षाच्या वतीने आपला उमेदवार कसा निवडून येईल. यासाठी डावपेच आखणी करण्यात येत आहे. रविवारी जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद आणि नगरसेवकांची बैठक जालना शहरात आली. या बैठकीतून माजी आ. सुरेश जेथलिया, मा.आ. कैलास गोरट्यांल व जालना जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष 
राजाभाऊ देशमुख हे उपस्थित होते. या सर्वांनी जि.प. सदस्य व नगरसेवकांची मते जाणून घेतली. स्थानिक स्वराज्य मतदार संघाची निवडणूक ही मोठी खर्चिक असल्याने पक्षाच्या वतीने योग्य उमेदवार दिला जाईल असे पटेल यांनी सांगितले.